मा.धनराज दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिते आरोग्य केंद्रात आशाताईंना साडी वाटप

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

माढा(दि.8फेब्रुवारी):- तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते व माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.धनराज दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिते प्राथमिक आरोग्य केंद्रात आशाताईंना साडी वाटप करण्यात आले.

कोरोणा काळाळ आपल्या जिवाची बाजी लावून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी निर्भिडपणे काम करुन आशाताईंनी मोलाची कामगिरी बजावली होती याचेच भान ठेवून मा.धनराज दादा शिंदे यांनी आपल्या वाढदिवसावरती होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून माढा तालुक्यातील सर्व आशाताईंना साडी वाटप करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला होता.

सदर कार्यक्रमासाठी मा.दादासाहेब देशमुख,मा.महादेव तात्या लांडे,मा.दत्तू नाना लामकाने,मा.गोरख शेळके,मा.बाळकृष्ण जगताप,मा.अनिल मुसळे मा.हनुमंत भोसले,मा.नवनाथ लामकाने,मा.दिनेश मुसळे,मा.सचिन मुसळे,मा.पप्पू बाबर, गणेश पावसे,श्रावण मुसळे यांच्यासह सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स,नर्सेस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.