जि. प.शाळा श्रीरामपूरची प्रतिक्षा उरकुडे आकाशवाणीवर

29

🔹शाळेबाहेरची शाळा उपक्रमात १०० व्या भागात मुलाखत

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.8फेब्रुवारी):-कोरोना संकटकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपक्रम राबविले जात आहेत.अशाच ‘शाळेबाहेरची शाळा ‘ या रेडीओ आधारित प्रसारित कार्यक्रमात जि प उच्च प्राथ. शाळा श्रीरामपूर ता राजुरा येथील प्रतिक्षा श्रीधर उरकुडे वर्ग 7 वी हिची 100 व्या भागात नागपूर आकाशवाणी च्या ‘अ’ केंद्रावरून 4फेब्रुवारी ला सकाळी 10.35 ला मुलाखत प्रसारीत झाली आहे.

यानंतर सुद्धा युट्युब व प्रथम अँप वर ऐकता येणार आहे.
विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या सहकार्याने प्रथम एज्यूकेशन फौंडेशन आणि जि प चंद्रपूर यांच्या सहकार्याने विविध सहशालेय उपक्रमासोबतच शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमात दर मंगळवार,गुरुवार आणि शुक्रवार ला नागपूर आकाशवाणी अ केंद्रावरून(५१२.८)सकाळी 10.35 वाजता प्रसारित केला जातो.

या कार्यक्रमात गणित विषयावर प्रतिक्षाची मुलाखत घेतली गेली आहे.यापूर्वी सुद्धा प्रतिक्षा नी अनेक तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत बक्षिसे मिळविली आहेत.यानिमित्ताने राजुरा तालुक्याच्या वतीने प्रतिक्षा व तिची आई प्रतिभा उरकुडे यांना आकाशवाणीवर व्यक्त होण्याची संधी मिळाली. यासाठी प स राजुरा गटशिक्षणधिकारी विजय परचाके,केंद्रप्रमुख सबद कौर भोंड ,प्रथम एज्युकेशन च्या सपना कुळमेथे,सरपंच वंदनाताई गौरकर,उपसरपंच हेमलता ताकसांडे, अध्यक्ष शा व्य स संगीता पिंपळकर,ग्राम विकास अधिकारी अमरदीप खोडके,मुख्याध्यापक मनोहर वाघमारे, शिक्षक अमित झाडे,लालचंद वाघमारे,वासुदेव सिडाम,पी आर धोटे यांनी प्रतिक्षाचे अभिनंदन केले.