अन्नदात्याच्या वाटेवर आज खिळे पेरणारे, उद्या बारुद पेरतील – जागे व्हा- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

33

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.८फेब्रुवारी):-आज अन्नदात्याच्या वाटेवर आज खिळे पेरणारे उद्या बारूद पेरतील – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर देशातला अन्नदाता शेतकरी दीर्घकाळ आंदोलन करतोय त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकार ज्या पद्धतीने त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोकशाहीच्या दृष्टीने फार भयावह आहे, ज्यांनी समाजसुधारक आणि संतांच्या वाटेवर काटे पेरले तेच शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे पेरत आहेत आणि लक्षात ठेवा उद्या हेच असे घडत त्याच वाटावर बारूद पेठेतील आणि देश असाच शांत असेल.बदनामी सोबत दंडिलशाही दडपशाहीचा वापर करून सुद्धा शेतकरी आंदोलन मोडीत निघत नाही उलट ते आणखी तीव्र होताना दिसतंय म्हणल्यावर देशातच काय जगात पण चर्चा होचारच की दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू आहे.

पावणे दोनशेच्या आसपास बळी गेलेत, शंभर पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, सुविधा तोडल्या जातायत तरी सुद्धा शेतकरी आपली एकवाक्यता टिकवून निकराची झुंज देतायत. एवढी गंभीर परिस्थिती बघून याची का नाही चर्चा होणार इथले राज्यकर्ते आणि त्यांच्या बोटावर नाचणाऱ्या कठपुतल्या असंवेदनशील असतील म्हणून काय जगात सगळीकडे तसंच असावं का…पॉप सिंगर रिहाना मोठी कलावंत असली तरी माणूसकीच्या दृष्टीकोनातून जगभरातील बऱ्याच विषयांवर भूमिका व्यक्त करत असते. मुळात हे करताना त्यांना तो विषयही तितकाच जाणून घ्यावा लागतो. कारण जगभरातील फॉलोअर्सच्या माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येतील याची आधीच दखल घ्यावी लागते.रिहानाने कोरोनासाठी 36 कोटी दान केलेत, इथल्या करचुकव्या पाणीपट्टी बुडणाऱ्या कथित सेलिब्रिटींची माणूसकीच्या बाबतीत तीच्या एवढी लायकी नाही.बऱ्याच जणांनी नावा वरुन गफलत झाल्याने ती मुस्लिम आहे का याचा शोध चालू केला, काल गुगलवर सर्वात जास्त तेच सर्च झालं. तर आयटी सेलने ती मुस्लिम असल्याचं घोषितही करुन टाकलं.

असो, तो वेगळाच विषय आहे.काल तीने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं आणि जिथं लागायला पाहिजेत तिथं बरोबर मिरच्या लागल्या.सरकारने भारतातले कथित सेलिब्रिटी कलावंत खेळाडू यासाठी कामाला लावले, जे कालपर्यंत या आंदोलना बाबत अवाक्षर बोलले नाहीत त्यांची अचानक सरकारच्या बचावासाठी स्पर्धा चालू झाली.मुळात पैसा कमावणे हे एकच ज्यांच उदिष्ट असतं त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा आहेत. पण हीच मंडळी या देशातला शेतकरी, मजूर किंवा अन्य सामान्य जनतेनं डोक्यावर घेऊन मोठी केली आहे याची जाणीव नाही त्यांना.एकीकडे अनेकांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. तर दुसरीकडे आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठून ते लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना त्यांचीच देशद्रोही खलिस्तानी अशी प्रतिमा बनवण्यात आमचं सरकार व्यस्त आहे. कोणासाठी करताय बाबांनो अदानी अंबानी सारख्या मूठभर लोकांसाठी.

कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस हीने देखील शेतकरी आंदोलनावर मोजक्या शब्दात समर्पक ट्विट केलंय. जगभरात सरकारची लख्तर फाटली आहेत. ती सावरायला भारतातले सेलिब्रिटी यात सहभागी झालेत. हरकत नाही पण डोक्यावर घेतलेल्या जनतेला यांची खरी ओळख तरी झाली. आत्ता खऱ्या अर्थाने शोषक विरुद्ध शोषनकर्ता लढाई चालू झाली आहे.पण अशा क्रांतीच्या वाटेवरून चालणारांचे पाय रक्ताळतील कदाचित ते मोडून ही पडतील. पण चालतच राहतील, हा इतिहास आहे.एकवेळ अशीच वाट आणि असेच खिळे तुमच्या गावच्या वाटेपर्यंत आलेले असतील. तेव्हा तुम्ही कोणत्या वाटेवरून चालालं.? या प्रश्नाचं उत्तर एकदा स्वतःला विचारा.. मन आणि मेंदू असेल तर अस्वस्थ व्हाल!आजपर्यंत कोणत्या लोकशाही असणाऱ्या देशात आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी भिंती कधी बांधल्या गेल्या आहेत का? रस्ते खोदले आहेत? रस्त्यावर जाड स्पाइक्स आहेत.आपण खरोखर लोकशाही असणाऱ्या देशाचे नागरिक आहोत? शेतकरी शत्रू नाहीत, जे त्यांच्या विरोधात युद्धासारखी तयारी केली जात आहे . ते या देशाचे नागरिक आहेत. त्यांना आपल्या मागण्या साठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पत्रकारांना अटक केली जात आहे.

त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आंदोलन स्थळावरील इंटरनेट बंद केले जात आहे.पाणीपुरवठा ठप्प केला आहे.ठीक आहे, लोकांनी तुम्हाला पूर्ण बहुमताने निवडून पाठविले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण स्वत: ची मनमानी कराल? 1984 मध्ये जेव्हा कॉंग्रेस 400 पेक्षा जास्त जागांवर आली, तेव्हा असे म्हटले जात होते की एवढ मोठ बहुमत हुकूमशाहीचा धोका निर्माण करेल . त्यावेळी जे झाले नाही, ते आता झाले. देशातील हे पहिलेच आंदोलन नाही .जे पी आंदोलन आरक्षण विरोधी आंदोलन अण्णा आंदोलन असे अनेक आंदोलन या देशाने पाहिले आहेत पण या आंदोलनाला कधीही देशद्रोही म्हटले गेले नाही, ना खलिस्तानी असे म्हटले गेले. तसेच त्यांना रोखण्यासाठी युद्धासारखी तयारी केली गेली नव्हती. आपल्या देशातील नागरिकांना शत्रु सारखे वागवले जाऊ नये असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी प्रशिद्दी पत्रातून व्यक्त केले आहेत,