महात्मा फुले हायस्कूलच्या पी.डी.पाटील सरांना महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

52

🔸कलासाधना सामाजिक संस्था नवीमुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे होणार सन्मान

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.9फेब्रुवारी):-  येथील महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना कलासाधना सामाजिक संस्था नवीमुंबई महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय “महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ ” साठी निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलासाधना सामाजिक संस्था नवीमुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले जाते. यामध्ये राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक – सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक, शिक्षीका व सामाजिक कार्य करणारे व्यक्ती यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार, राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

सन्मानार्थी शिक्षक – शिक्षीका यांचे शैक्षणिक चळवळीतील काम पाहून हा पुरस्कार दिला जातो.राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने पुरस्कार प्राप्त होणे हे खूप भाग्याचे आहे. जळगाव जिल्ह्यातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून ” महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२१” साठी त्यांची निवड करण्यात आली.

पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी व्यक्तींना दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. सिद्धिविनायक मंदिर हॉल, सेक्टर – ५ , ऐरोली, नवी मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातले जेष्ठ सिने अभिनेते – जयराज नायर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे – चित्रकार दीपक रमेश पाटील, राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्या ज्येष्ठ समाजसेविका – जयश्रीबाई सावर्डेकर , मा.सुरेश माळी – शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे