“डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर” या मारोती धुळध्वज लिखीत पुस्तिकाचे प्रकाशन संपन्न

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.9फेब्रुवारी):- येथून जवळच असलेल्या चार्वाक वनात त्यागमूर्ती माता रमाईच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात से.नि.प्राचार्य मोरोती लक्ष्मण धुळध्वज लिखीत “डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर ” या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले.बालकावर संस्कार व्हावेत या हेतूने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि.जिल्हाधिकारी मनोहरराव भगत होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून धम्मभूषण अॕड.अप्पाराव मैंद ,सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी धुळे, चंद्रप्रकाश मनवर हे उपस्थित होते .

कार्यक्रमापुर्वी बुद्ध मूर्तीसमोर वंदना घेण्यात झाली आणि त्यानंतर म.फुले,सावित्रीमाता,डाॕ.बाबासाहब आंबेडकर आणि माता रमाई याच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.याच कार्यक्रमात चार्वाक वनाचे संस्थापक धम्मभुषण अॕड.अप्पाराव मैंद यांना महाबोधी बहु.संस्थेने वटफळी येथे संपन्न झालेल्या धम्मपरिषेदेत धम्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले ,त्याबद्दल धुळध्वज दाम्पत्यांंने त्यांचा येथोचित सत्कार केला.आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

” सौ बका और एक लिखा ” बोलणे सोपे असते आणि फारशी बोलणा-यावर जबाबदारी नसते.परंतु लिखाण जबाबदारीने करावे लागते .तसेच लेखकाला प्रचंड अभ्यास कारावा लागतो.लेखकाची चूक क्षम्य नसते आणि लेखकाला पल्टी खाण्याचा पर्यायही नसतो.पुस्तक लिहिणे आणि त्यातल्या त्यात बालकासाठी पुस्तक लिहिणे कौसल्याचे काम असते.ज्याप्रमाणे मधुमाशी फुलांतून मध शोषून घेते तसेच कौसल्य बाल साहित्यकात असावे लागते.” असे उद्गार धम्मभूषण अॕड.अप्पाराव मैन्द यांनी पुस्तकाच्या प्रकाशनपर बोलतांना काढले आणि लेखकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

प्रास्तविक गोवर्धन मोहिते यांनी केले.कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंतराव देशमुख ,से.नि.प्राचार्य एस.आर.बनसोड सर, डी.जी.पाईकराव, चंद्रप्रकाश मनवर ,बसमतचे शायर आणि लेखक शिवाजी पवार आणि बापूरावजी धुळे यांची यथोचित मार्गदर्शक भाषणे झाली.शेवटी लेखक मारोती धुळध्वज यांनी पुस्तक लिहिण्याचा हेतू आपल्या मनोगतातून व्यक्त केला आणि उपस्थिताचे आभार मानले.अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी लेखक धुळध्वज यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अध्यक्षीय समारोप केला.या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने उपासक – उपासिका उपस्थित होते.