कुंडलवाडी च्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ.नरेश बोधनकर

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.9फेब्रुवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदी कुंडलवाडीचे भूमिपुत्र डॉ. नरेश बोधनकर यांचे ५ फेब्रुवारी रोजी नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून ६ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला त्यांची नियुक्ती बद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मान्य असून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे व डॉ.गणेश वडजे यांची नियुक्ती शासनाच्या मार्फत करण्यात आले होते.

परंतु गणेश वडजे हे पदवीधर शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासुन हे पद रिक्त होते या रिक्त पदावर कुंडलवाडीचे भूमिपुत्र डॉ.नरेश देविदास बोधनकर यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने शहर व परिसरातील जनतेला उत्तम सेवा मिळणार असल्याचे जनतेतून सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी सातमाड, डॉक्टर विनोद माहुरे ,एस.डी.सावंत,श्रीकांत जाधव, मुंडे, के एम शेख, पडलवार , देव कांबळे,आदींची उपस्थिती होती.