आणखी एक धक्कादायक घटना- बीड च्या तरूणीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या

    39
    1. ?घात की आत्महत्या अशी चर्चा सुरू आहे

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    गेवराई(दि.9फेब्रुवारी):- बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आणखी एक धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. परळी येथील रहिवासी पूजा लहू चव्हाण या २२ वर्षीय मुलीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून 22 वर्षाच्या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील महमदवाडी येथे उघडकीस आली. आत्महत्याचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली.पूजा लहू चव्हाण (वय 22, सध्या रा. लेन नं. 10, हेवनपार्क, मुळगाव परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

    वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती भाऊ विलास चव्हाण व मित्र अरूण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मनक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरूण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुजा चव्हाण यांचा घात की अपघात अशी चर्चा होत आहे.