के.रामलू शाळेतर्फे श्रीरामजन्मभूमी मंदीर बांधकामास अकरा हजार रुपयाचा निधि

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.9फेब्रुवारी):-दिनांक. 08 फेब्रुवारी 2021 रोजी के.रामलू पब्लिक स्कूल येथे श्रीरामजन्मभूमी मंदीर बांधकाम निधि संकलनासाठी आलेल्या मान्यवरांचे यथोचित सत्कार करून अकरा हजार रुपयाचा निधि देण्यात आला.

ह्या निधि संकलनासाठी आर. एस. एस. चे मा. तालुका संघचालक मा. विश्वनाथ गुंडय्या दाचावार, सुनिल देशमुख, दुर्गादास देशमुख, विजय मोरगुलवार, स्वप्नील भाले, शंकर क्यादरवार, शिवाजी मोकले व गोपीनाथ शिंदे हे उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष मा. सायरेड्डी ठक्कुरवार, संचालिका रमा मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक अविनाश गुजेवाड प्रिंसिंपल गोसुला यांच्या हस्ते अकरा हजाराचा निधि देण्यात आला.