बेटमोगरा येथे दिव्यांग वृध्द निराधार यांचा भव्य मेळावा

26

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

मुखेड(दि.9फेब्रुवारी):- दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला. प्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन व कार्यक्रमाचे दिव्यांग सं. संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी ७८ सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळण्या करिता गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळणार नाही.

दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून
घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी.यासाठी मुखेड तालुका संपर्क अध्यक्षपदी रामकिसन कांबळे, बेटमोगरा जि प.सर्कल प्रमुख बबनराव पांचाळ, प.स.सर्कल प्रमुख बाबुराव फुलारी,चांडोळा प. स सर्कल प्रमुख अनिलकुमार नारनाळिकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

डाकोरे पाटील यांनी ज्या दिव्यांग बांधवाना चालता येत नाही ,आपली कल्पना सांगण्यासाठी बोलता येत नाही, जगात काय चाले ते ऐकु येत नाही, जगातील चिञ पाहाता येत अशाना शासन प्रशासन मदत करणे गरजेचे असताना शासन दिव्यांग कायदा करून सुध्दा त्यांची अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल.

म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित आदिवासी जंगल अधिकार व जमिन हक्क परिषद २१ फ्रेबु २१ ला किनवट येथे गजानन मंदिर किनवट येथे आदिवासी, गायरान पट्टे धारक, दिव्यांग बांधवानी हजारोच्या संख्येची उपस्थित राहून संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर, केंद्रीय सचिव अशोक घायाळे, जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,रंगनाथ भालेराव,गुंडाजी बोयाळ, कुचनवाड राजु, हंनमत हेरगिरी, शादूल शेख, पांडुरंग सुर्यवंशी,योगेश्वरी बरगे,सलिभ दौलताबादी, बाबुराव कांबळे, मानसिंग वडजे, तोटरे, बालाजी जाधव, चापलवाड, देशमुख  ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते