अर्जुनी कोकेवाडा येथे पट्टेदार वाघाचा मृत्यू

    60

    ✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

    शेगाव(दि.9फेब्रुवारी)- येथून जवळच असलेल्या अर्जुनी कोकेवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत सुरू असुन आज सकाळ च्या सुमारास शेत शिवारात एक वाघ मृत्यूमुखी पडला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खडबड उडाली. या घटनेची अधिक माहिती मिळताच घटना स्थळी वनविभाग तसेच शेगाव येथील पोलीस कर्मचारी दाखल झाले.

    तेव्हा या गंभीर घटनेची बाब लक्षात घेता याची सखोल चौकशी व पंचनामा वन विभागाचे कर्मचारी , पोलीस कर्मचारी करीत आहे. दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्त लिहे पर्यंत पंचनमा सुरू होता . याचा अधिक तपास शेगाव येथील ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण जाधव तसेच पोलीस कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी करीत होते.