माण तालुका काँग्रेस पुन्हा जोमाने उभा राहिल- निलेश काटे

28
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

दिल्ली(दि.9फेब्रुवारी):- येथे सुरू असलेल्या शेतकरी अंदोलनला पाठिंबा दर्शवन्यासाठी माण तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने दहिवडी तालुका माण येते ‘किसान संमेलन’ आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी निलेश काटे बोलत होते.त्या वेळीस एम.के.भोसले (माण तालुका काँग्रेस अध्यक्ष), विश्वंबर बाबर सर, नगरसेवक विकास गोजारी, अनिल लोखंडे, बाबासाहेब माने, शिवाजी भोसले व यादव उपस्थित होते.

निलेश काटे म्हणाले कि या अंदोलनाच्या काळात सुमारे 155 शेतकरी यांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे तरी सुद्धा भांडवल दाराचे हित जोपसणारे हे सरकार उद्यमपणे वागत असुन शेतकरी यांचा आक्रोश दुर्लक्षित करित आहे.
शेतकरी यांच्या न्याय मागण्या मंजूर करण्या ऐवजी शेतकरी यांच्या विरोधात खोटया बातम्या करन्याचे काम मोदी सरकार करित आहे हि अत्यंत दुर्भाग्य पूर्ण बाब आहे.जो पर्यंत हे तिन कृषी कायदे मोदी सरकार माघार घेत नाही तो पर्यंत आंदोलन करित राहणार असे निलेश काटे यांनी बोलताना आपले मत मांडले.यावेळी माण तालुक्यातील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.