संभाजी ब्रिगेड चे कुर्डूवाडी येथे इंधन दरवाजा विरोधात आंदोलन

25

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9फेब्रुवारी):-संभाजी ब्रिगेडच्या वतीने इंधन दरवाढ व वीज बील माफी साठी केंद्र सरकार व राज्य सरकार निषेधार्थ कुर्डूवाडी येथे आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेल्या तुघलकी इंधन दरवाढ व राज्य सरकारकडून केलेल्या वाढीव वीज बील माफी व कनेक्शन कट करु नये याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निषेधार्थ आंदोलन करुन मा.प्रधानमंत्री व मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.

निवेदन प्रांताधिकारी कार्यालय कुर्डूवाडी यांच्याकडे नायब तहसीलदार रवींद्र कदम देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,सचिव सुहास टोणपे,जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, करमाळा संपर्कप्रमुख गणेश शिंदे,सतीश चोपडे,ता.उपाध्यक्ष अविनाश पाटील,गटप्रमुख रोहीत पाटील,बाळासाहेब वागज,शिवराज पवार,बालाजी पाटील,गणेश जगताप,विद्यार्थी आघाडीचे शंकर नागणे,श्रीकांत गायकवाड,प्रताप ईंगळे ई*..