युवा नेते सोनू नाकतोडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस मध्ये प्रवेश

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.10फेब्रुवारी):- ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व परिचीत असलेले युवा तडफदार नेते, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष , नवनिर्वाचित ग्रा. प सदस्य सोनू नाकतोडे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सह यांनी तालुका काँग्रेस कार्यालय येथे तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जी. प. सदस्य प्रा. राजेशजी कांबळे, प्रमोदभाऊ चिमुरकर, न. प बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार, नगरसेवक महेशभाऊ भर्रे, प. स. सदस्य कायरकर, प्रमोद मोटघरे, याच्या उपस्थित आज तालुका काँग्रेस कार्यालय ब्रम्हपुरी येथे प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वत ठाम विश्वास ठेऊन भविष्यामध्ये त्याच्या सोबत काम करण्याची व गावाच्या सर्वागिन विकास करण्याचा निर्धार ठेऊन काँग्रेस पक्षात युवा नेतृत्वला प्राध्यान्य दिला आहे.

प्रथमच उदापूर ग्रामपंचायत निवनुकी मध्ये सोनू नाकतोडे यांना सरपंच बनण्याची संधी नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली आहे. व उपसरपंच योगेश तूपत व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धर्मपाल नागदैवते, अश्विनी बुल्ले, अरुण करानकर, शालिनी तोंडरे, प्रमिला नवघडे, वैशाली ठाकरे, सुरेखा नाकतोडे, यांना पुढील वाठचालीसाठी मदत व पुनर्वसन तथा जिल्हाचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.