भारतीय बौद्ध महासभा केज च्या वतीने पुरोगामी पत्रकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार संपन्न

    38

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

    केज(दि.10फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या केज शाखेची नवीन कार्यकारिणी ची शासकीय विश्रामगृह केज येथे घोषणा करण्यात आली. वंचित ,गरीब,शेतकरी अन्यायग्रस्त ,तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यारा पत्रकारांचा एक संघ म्हणून पुरोगामी पत्रकार संघाकडे पाहिले जाते.

    संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शाखा जाहीर करण्यात आल्या त्यात केज तालुकाध्यक्ष पदी दत्तात्रय मुजमुले व सचिव पदी रणजित घाडगे ,तालुकाउपध्यक्ष म्हणून हनुमंत गव्हाणे ,शहर संघटक म्हणून अनिल वैरागे, कार्याध्यक्ष म्हणून नवनाथ पौळ तर सदस्य पदी अत्यानंद कांबळे व अमोल सावंत यांच्या निवडी करण्यात आल्या त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहेत्याचाच एक भाग म्हणून केज तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्काराचे आयोजन फुले नगर तालुका सरचिटणीस बालासाहेब जोगदंड यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.

    यावेळी तथागत गौतम बुद्ध ,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बालासाहेब जोगदंड व केज शहरातील नामवंत समाजसेविका विमलताई जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जोगदंड यांनी करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष युवराज हिरवे,कोषाध्यक्ष बळीराम सोनवणे, सरचिटणीस बाळासाहेब जोगदंड,बौद्धचार्य शिंदे. एस.बी ,दिलीप बनसोडे रजनेश गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.