बंजारा समाजाच्या पोटी जन्माला आलेली पुजा नावाची शेरणी आत्महत्या करुच शकत नाही,CBI चौकशी झाली पाहिजे -बी एम पवार

    46

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    बीड(दि.11फेब्रुवारी):- जिल्ह्याच्या मायभुतीत आणि बंजारा समाजाच्या पोटी जन्माला आलेली पुजा चव्हाण नावाची शेरणी आत्महत्या करुच शकत नाही अशी राज्यातील बंजारा समाजाच्या तरुणाच्या भावना आहेत, पुजाची हकनाक माध्यमातून बदनामी केली जात आहे याकरिता CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी केली आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे,पुजा चव्हाण ही युवती बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवासी आहे, पुजा हि बंजारा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होती.

    एवढेच काय तर गोर गरिबांच्या सुख दुःखात सहभागी होत असत. लाॅक डाऊन च्या काळात तीने लोकांना अन्न धान्य वाटप केले, गोर गरिबांच्या हक्कासाठी ती रस्तावरची लढाई लढली.परंतु ती कधीच डगमगली नाही आणि कोणाला भिक घातले नाही.पुजा चव्हाण हिच्या मृत्युची बातमी जेंव्हा कळाली तेंव्हा राज्यातील बंजारा समाजामध्ये शोक कळा पसरली, पुजा चव्हाण हिने आत्महत्या केली म्हणून सांगीतले जात आहे परंतु या घटनेवर बंजारा समाजाचा आणि युवकांचा विश्वास बसत नाही.

    समाज हितासाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी लढणारी बंजारा शेरणी आत्महत्या करुच शकत नाही अशी राज्यातील बंजारा समाजाच्या तरुणाच्या भावना आहेत. समाजाच्या हितासाठी व हक्कासाठी लढणारी तरूणीची बदनामी केली जात आहे.म्हणून बंजारा शेरी पुजा चव्हाण हिच्या मृत्युची CBI चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काय आहे हे समाजाला कळाले पाहिजे अशी मागणी सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी केली आहे,या पत्रकावर गणेश चव्हाण, विनोद चव्हाण, विष्णू राठोड, सुनिल चव्हाण, दत्ता राठोड, अजय राठोड, संतोष चव्हाण, सुरेश पवार, आबासाहेब पवार, केशव राठोड, अविनाश राठोड, पपु राठोड, प्रकाश राठोड, संतोष जाधव यांच्या सह अनेकांची नावे आहेत.