गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे यूट्यूब लाईव्ह १५ वा ऑनलाईन गझल मुशायरा

24

✒️अशोक हाके(विशेष प्रतिनिधी)मो:-9970631332

गझल मंथन साहित्य संस्था, मुंबई : गझल मंथन साहित्य संस्था आयोजित गझल मुशायरा गझल मंथन साहित्य संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह ठेवण्यात आला आहे. हा पंधरावा ऑनलाईन गझल मुशायरा आहे. हा मुशायरा गझल मंथन साहित्य संस्थेच्या यूट्यूब चॅनेल वर लाईव्ह प्रसारित होणार आहे. गझल मंथन यू ट्यूब चॅनेलच्या लिंकवर http://youtube.com/c/गझलमंथनसमूह येथे गझल मुशायरा आपण बघू शकता. तरी सर्वांनी गझल मंथन साहित्य संस्थेचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करण्याचे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव आ. जयवंत वानखडे सर यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

दिनांक १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी संध्याकाळी ०८.०० वाजता हा गझल मुशायरा लाईव्ह पार पडेल. गझल मंथन साहित्य संस्थेच्या सहसचिव आ. उमा पाटील मॅडम यांच्यातर्फे ही संकल्पना मांडण्यात आली आहे. या गझल मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर सर स्वीकारणार आहेत. गझलकार विश्वनाथ जोशी, गझलकारा डॉ शामा सिंगबाळ, गझलकार दत्तभार्गव टेंडसे,गझलकारा डॉ माधुरी चव्हाण, गझलकार सचिन मणेरीकर, श्रद्धा खानविलकर, गझलकार चंद्रशेखर गावस,गझलकारा उत्तरा जोशी,गझलकार प्रकाश क्षीरसागर यांचा सहभाग असणार आहे.

गझलकार दत्तप्रसाद जोग सर या मुशायऱ्याचे बहारदार सूत्रसंचालन करणार आहेत. गझल मंथन साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष आ. देवकुमार गुमटकर सर यांचे गझल मुशायऱ्यासाठी तांत्रिक साहाय्य लाभत आहे. गझल मुशायऱ्याबद्दल अधिक माहितीसाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे सर ९०२९२५५४५२ या नंबरवर संपर्क साधावा. गझल मुशायऱ्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद देवून गझल मुशायरा यशस्वी करण्याचे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे करण्यात येत आहे.