मृगजळाचे बांधकाम

31

मृगजळाच्या बांधकामाचे
इमलेच्या इमले चढत आहेत.
माणसाला माणसातूनच
वजा केल्या जात आहेत.
आंदोलनजीवी व परिजीवी माणसाच्या नव्या जाती
संसदेत तयार केल्या जात आहेत.
आंदोलनाच्या खऱ्या इतिहासाला
खोट्या शब्दफवाऱ्याने पुसून
टाकले जात आहे….
सत्तेच्या रक्तपीपासू आंधळ्याजन्य
विकृत महाजालाने
नवी बिनचेहऱ्याची निर्जीव माणसे उभी होत आहेत.
आंदोलन मानवाच्या शोधबुध्दीचा
आरंभबिंदू…..
माणसाच्या पराक्रम इतिहासातील
असीम असा अध्याय…
अश्मयुगाच्या आंदोलनातून मानवी समाजाची निर्मिती होऊ लागली.
अमाणुषतेच्या पायावर उभ्या असलेल्या अज्ञानाला
तथागत गौतम बुध्दांनी इहवादी विचारांने ,विज्ञानवादी कार्यकारणभावाने हाणून पाडले..
अवैज्ञानिक काल्पनिक व्यवस्थेच्या षडयंत्रावर महान प्रहार केला…
आणि समस्त जगाला
अत्त-दीप-भवः चा नवा
ज्ञानप्रकाश दाखवला…
वैदिक सनातनी परंपरावर
करूणामय महाविद्रोह केला..
स्वराज्य स्थापनेचे आंदोलन,
संताचे क्रांतीप्रबोधन आंदोलन,
सती प्रथा व बालविवाह आंदोलन
महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे स्त्री शिक्षण आंदोलन,
समंतीवय विधेयक आंदोलन,
स्वातंत्र्याचे आंदोलन,
देवदासी आंदोलन,
महाड चवदार तळे व काळाराम मंदिर महाआंदोलन,
अस्पृश्यता निर्मुलन आंदोलन,
धर्म परिवर्तन आंदोलन,
मानवनिर्मितेचे संविधान आंदोलन,
या आंदोलनानी नव्या भारताची उभारणी केली…
हिंदूस्थान ऐवजी India म्हणजे भारत ची निर्मिती केली….
आणि
मनुशाहीचा पराभव झाला.
पण आज रक्तपीपासू कौर्यजीवी
विषाणूमय अतार्तिक बेईमानी
आंदोलनाला भेदमूलक नजरेने पाहतात…
नव्या मूल्यमंथनाच्या वाटा बंदिस्त करतात…
भारतीय संविधानाला अंधाऱ्या मुलूखात ढकलतात..
नव्या जीवाणूचे जत्थे
भारताचा सामाजिक आधारस्तंभ
बरबाद करतात..
आता आपण सावध होऊन
या मुलूखाला वाचवू या…
भारतीय मानसाला नवी
उभारी देऊ या…
भारतीय लोकशाहीवर होणाऱ्या
मृगजळाचे बांधकाम उध्दवस्त करू या…
मानवाचे सुंदर असीम नवे भारतविहार बांधू या…
चला मित्रांनो प्रीयाम्बलचे नवे
सरोवर निर्माण करू या…

✒️लेखक:-संदीप गायकवाड
नागपूर(मो:-९६३७३५७४००)