सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश

26

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

माढा(दि.12फेब्रुवारी):-तालुक्यातील उपळवटे येथिल सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी टेंभुर्णी केम एसःटि बस सेवा बंद असल्यामुळे कन्हेरगांव दहिवली उपळवटे सातोली केम येथिल नागरिकांनी टेंभुर्णी केम हि एसःटि बस सेवा लवकरात लवकर चालू करण्यात यावी अशी मागणी केली होती या सर्व गावातील जनतेची अडचण लक्षात घेऊन उपळवटे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी कुर्डूवाडी आगारातील सहायक वहातुक अधिक्षक विजय हांडे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे टेंभुर्णी केम एसःटि बस सेवा चालू करण्याची मागणी केली.

त्यानंतर आम्ही केलेल्या मागणीची पुर्ण पणे दखल घेऊन कुर्डूवाडी आगारातील सहायक वहातुक अधिक्षक विजय हांडे साहेब यांनी आज रोजी टेंभुर्णी केम एसःटि बस सेवा चालू केली आहे हि एसःटि बस सेवा चालू झाल्यामुळे प्रत्येक गावातून संदिप घोरपडे यांचे कौतुक होत आहे.

त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे येथुन पुढे हि माढा तालुक्यातील सर्वचं गावातील नागरिकांची सामाजिक कामे करुन जनहित जोपासणार असल्याचे संदिप घोरपडे यांनी सांगितले.यावेळी उपस्थित कुर्डुवाडी आगारातील सहायक वहातुक अधिक्षक विजय हांडे साहेब वहातुक नियंत्रक मधुकर डांगे पंकज गायकवाड शिवराज पाटील गणेश मोरे सचिन हनुमंत भिसे संपत जाधव उदय लोंढे संदिप घोरपडे आदि मान्यवर उपस्थित होते