लोकमत वाले दादा! पूजा चव्हाण सोबत जामनेरची सिमा वानखेडे हिच्याही आत्महत्त्येला चॅनलवर घ्या

  32

  लोकमतच्या फेसबुक चॅनल वाल्यांना एक नम्रपणे विनंती करावीशी वाटतें की, परळी जिल्हा बीड येथील बंजारा समाजातील 23 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात जाऊन आत्महत्त्या केल्याचं वृत्त झळकवत आहात ही चांगली गोष्ट आहे.त्या तरुणीच्या आत्महत्त्येमागें कोण आहे?तिचे फोटो आणि ती ज्या भाजपाच्या व सेनेच्या आमदार,खासदार व मंत्र्याच्या समवेतचें फोटोपण प्रसारीत करताहोत तर हत्त्येच्या संदर्भाने भ्रामकता का निर्माण करता? चॅनलने निर्भयपणे भूमिका मांडली पाहीजे.पूजा चव्हाण ही बंजारा समाजातील एक टिकटॉक VDO बनवणारी तरुणी होती असे म्हंटले जाते.म्हणजे तिला तिच्या भविष्यातील महत्वाकांक्षेच्या प्रतिपूर्ती साठी कोणी अमिषा दाखवून यौनशोषण केले असण्याची शक्यता आहे काय? हेही ठामपणे मांडले पाहिजे.

  जसें पूजा चव्हाण हे प्रकरण चॅनलवर आणता तसेच नविदाभाडी ता.जामनेर,जिल्हा जळगांव येथील दलित समाजातील 12 वीत शिकणारी सिमा संतोष वानखेडे हिच्यावर दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी अक्षय चोपडे व ऋषिकेश कोळी यांनी बलात्कार करून तिला आत्महत्येस भाग पाडले या बाबतही लोकमत चॅनलवरुन बातमी लावावयास हवी होती?दोन्ही आत्महत्याच आहेत.तेंव्हा पूजा चव्हाण हिस तर न्याय मिळवून देणेसाठी निर्भयता दाखवा पण सिमा वानखेडे ह्या दलित तरुणीस सुद्धा आपल्या चॅनलवर ( space) जागा द्या! कारण राजकारणातील बड्या वजनदार व्यक्तींनी यौनशोषण केले, बलात्कार केला किंवा अन्य गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली तरी कायदा तिथे योग्य पद्धतीने कांम करत नाही. उलटपक्षी अशी प्रकरणे दडपुन टाकण्याला राजाश्रयही मिळतो आहे.

  मीडिया श्रीमंत अभिनेता सुशांतसिंहच्या अगदी आत्महत्या प्रकरणांत 3-3 महिने बातम्या लावतो ! पण सिमा वानखेडे SC अन पूजा चव्हाण( भटकेविमुक्त) यांच्या आत्महत्यानां किती न्याय मिळवून देतो ते आम्हांस अभिप्रेत आहे.

  ✒️लेखक:-अनंतराव सरवदे
  ( सेवानिवृत्त तहसीलदार बीड)
  मो- 94222 30742