कु.प्रतिभा मांडवकर ठरली जिल्ह्यातील युवा महिला सरपंच

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.13फेब्रुवारी):-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महाडोळी – शेगांव (खुर्द) गटग्रामपंचायत मध्ये नुकत्याच पार पडलेल्या अटितटीच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणूकीत शेगांव (खुर्द) येथील कु.प्रतिभा शालीक मांडवकर या २१ वर्षीय बीएससी द्वितीय वर्षाला आनंद निकेतन महाविद्याल वरोरा येथे शिकत असलेल्या अविवाहीत युवतीचा अटीतटीच्या निवडणूकीत ४ विरुद्ध ३ ने विजयी होवून महाडोळी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान झाली.

या ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या सरपंच पदासाठी तीन महिला उमेदवार दावेदार असतांना तिला हा विजय मिळाला. आजपर्यंतच्या महाडोळी ग्रामपंचायतच्या इतिहासातील सर्वांत युवा महिलेची ही निवड असून संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा सर्वात युवा महिला सरपंच म्हणून मान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाडोळी गावात पाच सदस्य असुन शेगांव खुर्द येथे दोनच सदस्य असतांना शेगांव (खुर्द) गावाला सरपंच पदाचा मान मिळाल्याने शेगांव (खुर्द) वासीयांमध्ये अबालवृद्धांपासून आनंदाचे वातावरण होते. तसेच अतितटीच्या या निवडणूकीत उपसरपंच पदावर महाडोळी येथील गिरीश ज्ञानेश्वर सातकर यांची बहुमताने निवड झाली. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही नव निर्वाचीत सरपंच प्रतिभा मांडवकर यांनी गावकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली. कु.प्रतिभाच्या सरपंचपदी निवडीमुळे ग्रामीण नवयुवकांना राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
————-