महाराष्ट्र विकास आघाडी करमाळा यांनी दिले दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा व समर्थन देण्यासाठी निवेदन

    32

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.13फेब्रुवारी):-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन महाराष्ट्र विकास आघाडी करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले. गेल्या अडीच महिन्यापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत पण गेंड्यांची कातडीचे केंद्र सरकार याविषयी गंभीर दिसत नाही. म्हणून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज दि १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकार्यांना व तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आले.

    याची सुरुवात आज करमाळा तहसीलदार यांना निवेदन देवून एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जर हे तीन काळे कायदे रद्द केले नाहीत तर भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विजय खुपसे-पाटील, आदित्य बंडगर,विजय बेरे,अमित चोपडे, आदि उपस्थित होते.