नारायण सेवा संस्थान देणार गंगाखेड येथील निवडक परीवारांना विना अनुदान राशन

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-माणसाला नारायणाचे स्वरूप समजुन असाहय दिव्यांग, मुक बधीर आणि कोरोना महामारी मुळे बेरोजगार झालेल्या गरीब कामगारांना नारायण सेवा संस्थान, उदयपुर करोना महामारी च्या काळात निर्माण झालेल्या परिस्थिति मुळे देशात टाले बंदी लागू झालेल्या दिवसा पासून उदयपूर मुख्यालय सोबत देशातील त्यांच्या शाखांतील माध्यमातून विना अनुदान दर दिवस भोजन दिले.व दर महिन्याला राशन वाटप करण्याची सेवा निरंतर देत आहे.संस्थान ने अशा गरजवंता साठी नारायण गरीब परिवार राशन योजना च्या माध्यमातून 50000 परिवारा पर्यंत राशन देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

संस्थान चे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की याच पद्धतीने दिनाक १४ फेब्रुवारी २०२१ ला गंगाखेड ( जिल्हा-परभणी) येथे राशन वाटप शिबिर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक किट मधे १५ किलो गव्हाचे पीठ,२ किलो चनाडाळ,५ किलो तांदुळ,२ किलो तेल,४ किलो साखर,१ किलो मीठ,व मसाले असे एकूण 30 किलो चे राशन परभणी जिल्ह्याच्या शाखा संयोजिका *मंजुताई दर्डा* यांनी सांगितले आहे ना.से.स. कार्यालय, कांकरिया निवास, मेन रोड, नवीन मोंढा, गंगाखेड येथे दिनांक १४ फेब्रुवारी २१ रविवारी सकाळी १० वाजता आयोजित वितरण शिबिर मधे निवडक गरजवंत परिवारांना राशन वाटप करण्यात येईल.