आजची शिक्षणपद्धती आणि आपण

26

संस्कार करणे. नागरिक घडविणे आचार विचार. राहणीमान. उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज असते त्यामुळे शिक्षणातून आपल्यावर राजकीय सामाजिक आर्थिक संस्कार केले जातात आज्ञापालन आणि शिस्तप्रिय यांचें महत्व आपल्या मनावर बिंबवले जाते अधिकार असणार याचा आदर करायला आपण शाळेत शिकतो चांगला नागरिक म्हणून आपली कर्तृत्व कोणते असतात तेही आपणास शाळेत शिकवले जाते. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हि प्रार्थना आपण शाळेत पाट केली असेल एक भारतीय नागरिक म्हणून असणारि कर्तृत्व या प्रतिज्ञेत स्पष्ट केली आहेत आपला देश त्याचा इतिहास याची माहिती देऊन देशाभिमान निर्माण करण्यात शिक्षणाचा मोठा वाटा असतो शाळेतल्या क्रमिक पुस्तकांमधून काय शिकवले जावे कोणते विचार मांडले जावेत यावर सरकार शासन नियंत्रण ठेवते आपल्या देशाच्या गरजा लक्षात घेऊन मुलांची जडणघडण व्हावी म्हणून सरकार शासन प्रयत्नशील राहते त्यामुळे तुम्ही कोणत्याही शाळेत गेला आणि जात असलातरी एकाच प्रकारची पुस्तके तुम्हाला आभयासावी लागतात पण प्रत्त्येक शाळेचे वातावरण वेगळे असते क्रमिक पुस्तके तीच असली तरी शिक्षकांकडून होणारे संस्कार वेगळेच असतात.

शाळेतून वाचण्याच्या. खेळाच्या स्पर्धा संधी मिळण्याचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे पुस्तके आणि अभ्यासक्रम एकाच प्रकारचे असले तरी काही शाळेतून मुलांना अधिक प्रमाणात संधी मिळते पुढाकार घेण्यास वाव मिळतो तर काही शाळांत औपचारिक शिक्षण तेवढे मिळते पण इतर संधी कमी प्रमाणात मिळते तेव्हा तुम्ही कोणत्या शाळेत शिकता कोणत्या माध्यमातून शिकता यावरही तुमच्यावर होणारे संस्कार अवलंबून असतात
एकिकडे सर्वांसाठी एकाच प्रकारच्या शाळा (सार्वजनिक शाळा‌) असाव्यात अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे उततमात उत्तम अशा शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड चालते लहान गावात राहणारे पालक आपल्या मुलांना शहरातील शाळेत पाठविण्याचा प्रयत्न करतात.

आज शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकून वकिल डॉक्टर,वैधानिक, न्यायाधीश,पोलिस, वैमानिक असे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मंत्री नेते यांनी सुध्दा शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच घेतलें होते. आपले विचार बदलले आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पध्दती बद्दल आपले विचार बदलले आपली मुले महागातलया महाग डोनेशन असणाऱ्या फक्त नाव मोठें असणाऱ्या शाळेत पाठवायला सुरुवात झाली. गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार यांच्या मुलांना बाहेरील शाळेचा खर्च झेपणारा नव्हता त्यामुळे त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेण्यासाठी झगडत आहेत तोपर्यंत शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळेत २०/पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आत्ता या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल मुलांचे काय?.

सर्वात मोठा घोटाळा आज कोणता असेल तर शिक्षण व्यवस्था. मोठं मोठी शाळा कॉलेज चालू करायची आणि अनुदानाची रक्कम लूटायची अनुदानित शाळांना मुलांच्या साठी राहणे कपडे जेवन इमारत खर्च असे विविध सवलतीसाठी अनुदान देण्यात येते पण मुलं शाळेत प्रवेश घेताना मोठी रक्कम डोनेशन म्हणून घेतलीं जाते, त्यावर शासनाचा अंकुश नाही. शाळेतील फि संदर्भात एक निर्णय शासनाने घेतला पाहिजे आणि सर्व शाळेत एकच फी घेणे बंधनकारक करण्यात आले पाहिजे त्यातच असंघटित बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे साठी तरतूद करण्यात यावी. आज शिक्षणाची अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याविरोधात लढण्यासाठी समाजसेवाकांनी उठाव केला पाहिजे,बंद,आंदोलन, मोर्चा, उपोषण, रस्ता रोको सनदशीर मार्गाने निवेदन देऊन, तक्रार अर्ज, मागणी अर्ज केला पाहिजे. त्यांचा प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध केली पाहिजे.वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी संधी मिळते. असेच विविध गाव तालुका जिल्हा राज्य देशपातळीवर किर्याशील कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे.

✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९
संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा