राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

25

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.15फेब्रुवारी):-माळशिरस तालका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांदुळवाडी गावचे ज्येष्ठनेते वसंतराव पाटील यांची नियुक्ती केली असल्याचे पत्र सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी वसंतराव पाटील यांना दिलेले आहे.तांदुळवाडी ता. माळशिरस गावचे रहिवासी असणारे वसंतराव पाटील यांच्याकडे माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. वसंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराने आजपर्यंतची राजकीय वाटचाल केली आहे. ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. वसंतराव पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी वसंतराव पाटील यांचा सन्मान केला.

माळशिरस तालुक्यामध्ये आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाशी सामावून घेऊन ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विचाराने चालणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची जबाबदारी असल्याने वसंतराव पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिलेली असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चर्चा आहे.

वसंतराव पाटील यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, जनसामान्यात मिळून मिसळून काम करण्याची पद्धत त्यामुळे निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या निवडीने माळशिरस तालुक्यासह तांदुळवाडी परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.