शेषनाग क्रिकेट क्लब व नगरसेवक प्रितीश बुरले यांच्या वतीने ब्रम्हपुरी येथे भव्य रात्रकालीन टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

28

🔸राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे, छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची प्रमुख उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15फेब्रुवारी):-शेषनाग क्रिकेट क्लब, युवा नगरसेवक प्रितीश बुरले व मित्रपरिवार यांच्या वतीने ब्रम्हपुरी येथील गीत सर्वो पेट्रोल पंप जवळ भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धैचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन दि. 16 फेब्रुवारी ला सायंकाळी 4 वाजता राज्याचे मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे ह्या राहणार आहेत.

तर विशेष अतिथी म्हणून ‘मी येतोय’ या मराठी मालिकेतील छोटा पुढारी घनश्याम दरोडे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद गटनेता विलास विखार, नगरसेवक बाला शुक्ला, नगरसेवक डाँ. नितीन उराडे, नगरसेवक महेश भर्रे, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेविका सरीताताई पारधी, नगरसेविका लताताई ठाकूर, नगरसेविका वनिताताई अलगदेवे, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका सुनिताताई तिडके ह्या उपस्थित राहणार आहेत.क्रिडाप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.