खरकाडाची जबाबदारी सुशिक्षित तरुणांच्या खांद्यावर

23

🔸गावविकास पँनल 9 पैकी 8 उमेदवार विजयी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15फेब्रुवारी):- गावात बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिर असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील काशी म्हणून ओळख असलेल्या खरकाडा गावातील ग्रामपंचायतीवर गावविकास पँनलने प्रस्थापितांना धक्का देत आपल्या पँनेलचे 9 पैकी 8 उमेदवार निवडून आणत गावविकास पँनलची सत्ता बसवली आहे.यामध्ये सरपंच पदी खुशाब सहारे तर उपसरपंचपदी ताराचंद पारधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीवर मागील 20 वर्षापासून काँग्रेस प्रणित पँनेलची सत्ता होती. परंतु यावर्षीच्या निवडणुकीत मात्र काही अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस समर्थित गटात विभाजन झाले. निवडणूक लढवण्यात आली.

गावविकास पँनलने सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर ढोरे व मुखरुजी पारधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. यामध्ये गावातील युवकांनी एकत्र येत तरुण उमेदवारांच्या बाजने मतदान केले. आणि गावविकास पँनलने निवडणुकीत बाजी मारली. यात खुशाब सहारे, ताराचंद पारधी, प्रफुल ठाकरे, अमर बगमारे, सौ. विदया प्रशांत ढोरे, सौ. भाग्यश्री किशोर शिवुरकार, सौ. कुंदा राहुल ठाकरे, सौ. विशाखा विनोद शिलार हे उमेदवार विजयी झाले. तर विरूद्ध पँनेलचे मात्र 1 उमेदवार विजयी झाले. गावविकास पँनेलचे निवडून आलेले सर्व उमेदवार सुशिक्षित व तरुण आहेत हे मात्र विशेष.