बेलारा-गोंडमोहाळी बफर सफारी पर्यटन गेट मधल्या क्षेत्रात वाघाचे दर्शन

27

🔹…हा बफर क्षेत्र ५० की.मी.

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.15फेब्रुवारी):- तालुक्यातील उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर बेलारा – गोंडमोहाळी सफारी पर्यटन गेट मधुन पर्यटकांनी ताडोबाची सफारी केल्यास वाघ , बीबटाचे तर अन्य वन्यप्राण्याचे साईड होत आहे.बेलारा – गोंडमोहाळी गेटचा बफर क्षेत्र ५० की.मी .चा आहे . बेलारा – गोंडमोहाळी गावकऱ्यांची ताडोबा बफर गेटची मागणी केली होती .ती तब्बल चार वर्षानी मागणी पुर्ण झाली.

१ जानेवारी २०२१ ला हा बफर गेट चालु झाला.त्यामुळे गावातील युवकांना रोजगार प्राप्त झाला. या गेटवर १४ गाईड व १४ ड्रायव्हर असतात. या गेटमधुन सकाळी ६.३० ते १०.३० पर्यंत पर्यटकाना प्रवेश करता येतो तर सायंकाळी २ ते ६ पर्यंत प्रवेश कळता येईल .दररोज सकाळी ६ व सायंकाळी ६ जीप्सी पर्यटकांंचा प्रवेश होत आहे.

या बफर गेटमधुन प्रवेश केलेल्या पर्यटकाना महाराणी वाघीन , महाराजा वाघ यांचे दर्शन होत आहे . तसेच चीतळ , मोर , हरीण , नीलगाय , रानटी डुक्कर , रानगवा , अस्वल , रानटी कुत्रे , तर महाडोर तलाव परीसरात बीबट , नवीन पक्षी , साप यांचे सुध्दा पर्यटकांना पहायला मीळत आहे.

भारतरत्न , क्रीकेटचा वाघ सचीन तेंडुलकर यांना सुध्दा ८ दीवसापुर्वी प्रवेश केला होता .त्यांना सुध्दा जंगलाचा राजा वाघ बघण्याचे भाग्य लाभले . पर्यटकांंसाठी गोंडमोहाळी येथील जंगलातील तलावात बोंटीग सुध्दा करण्यासाठी सुवीधा आहे.या गेटमधुन प्रवेशासाठी ऑफलाईन (ऑन दी स्पाट ) तर ऑनलाईन सुध्दा आवेदन करता येईल . एका जीप्सीवर ६ पर्यटकांना प्रवेश आहे.वाघ व बीबटाचे बेलारा – गोंंडमोहाळी ताडोबा बफर गेटमधुन साईड होत असल्यामुळे पर्यटकांची या गेटमधुन जाण्यास पसंती देत आहे.