मांदुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सुनंदाबाई दगडू पाटील यांची बिनविरोध निवड

23

🔹उपसरपंच पदी मंगलबाई नामदेव पाटील

✒️चाळीसगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चाळीसगाव(दि.16फेब्रुवारी):- तालुक्यातील मांदुर्णे ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशासनाचे अधिकारी कैलास माळी यांनी नवनियुक्त सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली.

मांदुर्णे गावाचे सुपुत्र गावावर अत्यंत प्रेम करणारे डी.जी.पाटील यांच्या पॅनलची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी सुनंदा दगडू पाटील, उपसरपंचपदी मंगलबाई नामदेव पाटील व ग्रामपंचायत सदस्य म्हणून चित्राबाई राजेंद्र पाटील, कैलास परशुराम पाटील, सुवर्णा लक्ष्मण पाटील, गोरख आत्माराम पाटील, मंगलबाई आनंदा पाटील, अन्वर गंभीर मन्सुरी, हरून जैनुद्दीन मन्सुरी, कौशल्याबाई ईश्वर मोरे, हिलाल त्र्यंबक महाजन, शिवाजी दामू महाजन, राहुल धोंडू भिल्ल यांची एकमताने निवड करण्यात आली.

प्रशासनाचे अधिकारी कैलास माळी यांच्या वतीने सर्व नवनवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पंचायत समिती सदस्य – भारती सुनील पाटील व पोलीस पाटील – भारती विष्णू पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्व मान्यवरांना मानाचा फेटा बांधण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांदुर्णे गावाचे सुपुत्र – आदर्श शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वाल्मीक नागो पाटील हे होते.

मांदुर्णे गावातील सामाजिक कार्यकर्ते दादासो. धर्मराज पुंडलिक पाटील व सत्यशोधक पुस्तक चळवळ धरणगावचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्या वतीने सर्व नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे महापुरुषांचे जीवन चरीत्र पर ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी गोबरवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दगडू पाटील म्हणाले हा विजय गावकऱ्यांचा आहे म्हणून सर्व गावकऱ्यांना मानाचा फेटा बांधण्यात आला. मांदुर्णे एक आदर्श गाव करण्याची संकल्पना, शासनाच्या विविध योजना राबवून ग्रामस्थांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार, गावातील वीज – पाणी – गटार – रस्ते – शिक्षण – पर्यावरण – ग्रामसभा – पारदर्शकता यांना प्राधान्य देऊन गावाचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आप्पासाहेबांनी नागरिकांना आश्वासित केले.

आप्पासाहेब डी.जी.पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन गावाने बिनविरोध सरपंच – उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना संधी दिली या संधीचे सोने करणार असे प्रतिपादन केले.
गावातील जेष्ठ नागरिक एकनाथ पाटील यांनी दीपक पाटील यांचं कौतुक केले व गावकऱ्यांनी योग्य हातात सत्ता दिली असा विश्वास दिला दीपक पाटील नक्कीच गावाचा विकास करतील. गावाला अभ्यासु- शिक्षीत सरपंच मिळाला याचा अभिमान आहे. असे प्रतिपादन केले.गावातील नवनियुक्त सरपंच सौ. सुनंदाबाई दगडू पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले यापुढे भ्रष्टाचार मुक्त गाव आपलं होईल, शासनाच्या प्रत्येक योजना या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचतील. यासाठी अधिकारी सक्षमपणे काम करतील असे ठणकावून सांगितले. कुणावरही अन्याय होणार नाही अशी मी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देते.

याप्रसंगी मांदुर्णे गावाचे सुपुत्र प्रमोद पाटील यांना “राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला व दुसरे सुपुत्र विनायक वसंतराव पाटील यांना “आदर्श अभियंता पुरस्कार ” नंदुरबार पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते मिळाला या दोघही सुपुत्रांचा सत्कार दीपक पाटील व मित्र परीवाराने अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन केला.यानंतर मांदुर्णे गावात नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांची भव्य रॅली निघाली ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे औक्षण करण्यात आले. नवनियुक्त सरपंच सुनंदाबाई दगडू पाटील यांच्या घरी अल्पोपहाराचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर नवेगाव येथे भव्य रॅली निघाली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानले आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी गावातील माजी सरपंच राजाराम सखाराम पाटील, प्रकाश पंडितराव पाटील, नामदेव माधराव पाटील, छगन नारायण पाटील, शिवाजी कृष्णा पाटील, रविंद्र जयराम पाटील, दगडू आत्माराम पाटील, सयाजी नमन पाटील, गावातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मान्यवर तसेच पंचायत समिती सदस्य भारती सुनील पाटील, सुनील सुभाष पाटील, पोलीस पाटील भारती विष्णू पाटील, विष्णू बाजीराव पाटील, व संपूर्ण मांदुर्णे गावाचे सर्व सन्मानणीय ग्रामस्थ बंधू-भगिनी युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऐतिहासिक रॅलीच्या यशस्वीतेसाठी दीपक पाटील, दगडू उत्तम पाटील, बापु कदम , महेश भावसार, विकास पाटील, प्रमोद पाटील, वासुदेव पाटील, राजेश पाटील, गोरख पाटील, गोविंदा, व समस्त तरुण वर्ग व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.