माण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता “सोशल डिस्टन्सीग” नियम पाळण्याचे म्हसवड नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन

    35

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी महसवड-माण)मो:-9075 686100

    म्हसवड माण(दि.18फेब्रुवारी):-तालुक्यात कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता माननीय उपविभागीय अधिकारी माण-खटाव उपविभाग दहिवडी यांच्या आदेशानुसार म्हसवड नगरपरिषदेने म्हसवड शहरात उपायोजना करण्यास सुरुवात केली असून म्हसवड शहरातील सर्व किरकोळ व्यापारी होलसेल दुकानदार दुकानातील कामगार यांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी करणे बंधनकारक आहे असे म्हसवड नगरपरिषदेकडून सर्व दुकानदार आणि व्यापारी यांना लेखी सूचना आणि नोटीस देण्यात आले आहे. जे व्यापारी सदर आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांना आपली दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत तसेच व्यवसायाच्या ठिकाणी कोरोनाविषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने पालन करणे आवश्यक आहे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचे नोटिशीत नमूद केले आहे.

    जे दुकानदार व्यापारी आणि नागरीक नगरपरिषदेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणार नाही त्यांना मास्क न वापरण्याबद्दल पाचशे रुपये दंड, सोशल डिस्टंसिंग चा वापर न करणाऱ्या दुकानदारांना प्रथम वेळेस एक हजार रुपये दुसऱ्या वेळेस 2000 रुपये आणि तिसऱ्या वेळेस पालन न करताना सापडल्यास तीन दिवस दुकान बंद ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.माण तालुक्‍यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे आठवडा बाजारांवर परिणाम होताना दिसून येत आहे यामुळे शेतकरी, व्यापारी आणि दुकानदार यांचे नुकसान होत आहे.म्हसवड शहरातील नागरिकांनी आणि जनतेने वेळोवेळी म्हसवड नगरपरिषदेकडून केलेल्या सूचनांचे पालन करावे आणि “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या योजनेचा लोकांनी वापर करून आपले कुटुंब आणि शहर सुरक्षित ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे.