कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मधील व्यापाऱ्यांचा माल तात्काळ उचण्यात यावा- महाराष्ट्र नवनिर्माण सेना

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.18फेब्रुवारी):-व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माळ हा तात्काळ न हटविता यार्ड मध्येच थप्या वर थाप्या मारून चार सहा महिने एकाच ठिकाणी राहतो व शेतकऱ्यांचा माल रोडवर टाकला जातो..या बाबत तक्रार होऊन देखील कोणतीही प्रकारची दखल सुद्धा घेत नाहीत या बाबतचे नेमके कारणही समजल्या जात नाही..वास्तविक पाहता शासनाच्या निर्णया प्रमाणे ११ वाजताची हर्यासी ३ वाजता केल्या जाते.याकडे कोणाचेही लक्ष नाही.महत्वाची बाब म्हणजे मार्केट बाहेर बसलेले दुकानदार व्यापारी स्वतः च्या फायद्या साठी शेतकऱ्यांनी आणलेला माल कमी भावात खरेदी करून ठोक व्यापाऱ्यांना दिला जातो काही विना परवाना व्यापारी शेतकऱ्याची सर्रास पणे लूट केल्या जाते.शेतकऱ्याच्या सुविधे करीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून खुल्या रस्त्यावर बेभरोशे ठेऊन पाणी साठी बाहेर जावे लागते..

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सी.सी.टिव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे.या सर्व बाबीची तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती…अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले…यावेळी संदीप लांडे तालुका अध्यक्ष,गोपाल चव्हाण शहर अध्यक्ष,रवी सूर्य तालुका उपाध्यक्ष,युवराज भोसले तालुका उपाध्यक्ष,आकाश रहाटे तालुका अध्यक्ष मनविसे,अजित रोडे शहर उपाध्यक्ष,सतीश गवारे शहर उपाध्यक्ष,सागर चिंतावार,गजानन पारध,वैभव तायडे,सतीश धवस्कर,राजेश इंगळे,लखन आडे,अर्जुन राठोड अक्षय इनामे,राहुल झींजारे यांच्या स्वाक्षरी आहेत…..