पिपर्डा ग्राम पंचायतवर श्री,आकाश सुरेश भेंडारे यांची सरपंच पदी निवड

25

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.18फेब्रुवारी):- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पीपर्डा ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आकाश भेडारे यांची निवड करण्यात आली.तर उपसरपंच पदी चंदन आनंदराव चुणारकर यांची निवड करण्यात आली.उपस्थित सदस्यणी हात वर करून मतदान केले ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत असल्यामुळे ९ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला बहुसंख्य सदस्य पुरोगामी विचारसरणीचे असून आगामी काळात ग्रामपंचायतीतील सर्वच पदाधिकारी ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकासात्मक कामे मार्गी लावतील असा विश्वास आकाश भेंडारे त्यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक अद्यासी अधिकारी म्हणून चौखले साहेब,मानकर ग्रामसेवक,दडमल तलाठी ,ग्राम पंचायत कर्मचारी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्या मध्ये ,चंदन आनंदराव चुणारकर, सुजाता राजू चुणारकर,स्वाती चंदन चुणारकर,दर्शना अरविंद भेंडारे,आकाश सुरेश भेंडारे,सारिका गंगाधर मेश्राम,भगवान खुशाल कावळे,दशरथ वारलुजी सहारे, वनिता चंदू मानकर या निवडीमुळे गावातील भारत भेंडारे, दिवाकर मेश्राम,चरण कळाम,कार्यकर्ते यांनी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.