चोरटी येथे संत तुकाराम महाराज जयंती महोत्सव थाटात साजरा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.18फेब्रुवारी):- कुणबी समाज संघटना चोरटी यांच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी तुकाराम महाराजांची जीवनशैली व त्यांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारावे असेही सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून व थोर महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर होते.तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. दामोधरजी शिंगाडे, पत्रकार तथा युवा व्याख्याते राहुल मैंद हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष मोंटु पिलारे, चौगान चे सरपंच उमेश धोटे, पोलीस पाटील कु.सूनिताताई उईके, चोरटि च्या सरपंच सौ.निशा अमर मडावी, उपसरपंच सुधाकर कांबळे, ग्रा.पं. सदस्या सौ.आशा चंदनखेडे, ग्रा.पं. सदस्या सौ. रजनी देशमुख, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र ठाकरे, श्री.राजेंद्र राऊत सदस्य ग्रा. पं, श्री.शालिक नन्नावरे सदस्य ग्रा. पं. , सौ. मरस्कोले सदस्य ग्रा. प.चोरटी, मानकर सर , चौधरी सर, गायधने सर,आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा. जयगोपाल चोले सर यांनी व आभार प्रदर्शन श्री.दीलीपजी राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.