बँकेचे दैनिक कलेक्शन करणाऱ्या युवकास चाकुचा धाकावर लुटले

24

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.१९फेब्रूवारी):-एका बँकेचे दैनिक कलेक्शन करणाऱ्या १७ वर्षीय युवकास चाकुचा धाकावर लुटल्याची घटना शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरात घडली.सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तालुक्यातील सुलतानपुर येथील दोन गुन्हेगारास अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार गौरव गोकुलदास येणुरकर(१७) रा. तुकडोजी वार्ड हिंगणघाट हा दिनांक १७ रोजी रात्री ८ वाजता दरम्यान डेली कलेक्शनचे पैसे करीत मोपेड गाडीवर बसुन असता आरोपीनी क्रमांक नसलेल्या स्कूटरवर येत चाकुचा धाक दाखवित मारहाण करून त्याचे पॅन्टचे खिश्यातील दैनिक जमा रक्कम नगदी 3 हजार रूपये असे जबरीने हिसकावुन नेले.
फिर्यादीचे तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी अप. क्रमांक १६२/२०२१ कलम ३९४,३४ भा.द वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला.
प्रस्तुत गुन्ह्याचेप्रकरणी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी आपले पथकासह आरोपी सुदन उर्फ लाल्या बंडुजी भगत (२४) तसेच रोशन गजानन भगत(२२) दोन्ही रा. सुलतानपुर (हिंगणघाट) यांना ताब्यात घेतले.

त्यांचेजवळून एक लाल पांढरे रंगाची होंडा कंपनीची ड्युयो मोपेड,एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.सदर दोन्ही आरोपीचा दिनांक 20 पावेतो पोलीस रिमांड घेतला. कबुली जबाबाप्रमाणे गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेल्या ३ हजार रूपयांपैकी २हजार २०० रुपये तसेच आरोपीजवळुन गुन्ह्यात वापरलेले वाहन, एक सॅमसंग मोबाईल, एक चाकु आणी नगदी २२०० रूपये असा एकुण ५७ हजार २००रूपयांचा माल जप्त करण्यात आला.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात तसेच ठाणेदार संपत चौहान यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा.विवेक बनसोड, ना.पो.शि.सुहास चांदोरे ,पंकज घोडे प्रशांत वाटखेडे पो.शि.उमेश बेले या चमुनी केली.