राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्रम्हपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

    34

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.20फेब्रुवारी):- बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या विविध सामजिक संघटनाच्या युवा पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे बहुजन प्रतिपालक बहुजन राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती प्रीत्यर्थ माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने. नरेश रामटेके, पद्माकर रामटेके प्रशांत डांगे ,डेव्हिड शेंडे ,विवेक रामटेके,सुरज मेश्राम, सतीश डांगे, प्रा. चंदन नगराडे, विलास मेश्राम, राहूल सोनटक्के,विजय मुपडे, प्रफुल फुलझेले ,नृपणाथ मेश्राम आदी सामजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.