दलित मानवाधिकार कार्यकर्त्याची कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.21फेब्रुवारी):-दि.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र यांच्यावतीने मालवण येथील सेफ्राॅन हाॅटेल येथे 20 व 21 दोन दिवसीय राज्य स्तरीय मानवाधिकार कार्यकर्ता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मानव अधिकार व अत्याचार पीडित या वर होणारे अन्याय अत्याचार तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्या संदर्भात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसूदा कायदा समिती सदस्य अॅड डॉ केवल उके, तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय समन्वयक अॅड नवीन गौतम यांच्या हस्ते व उच्च न्यायालय मुंबई चे अॅड बि जी बनसोड,नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारणीतसेच राज्य कार्यकारणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या शाळेसाठी सोलापूर,लातूर, पुणे, रायगड, मुंबई ,हिंगोली, वाशिम ,रायगड सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग येथील रिपाईचे नेते तानाजी कांबळे, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र चे राज्य सचिव वैभवजी गिते,प्रा.रमाताई अहिरे, राज्य सहसचिव पि एस खंदारे,बि पी लांडगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, आदींची उपस्थित होती.

पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्याचे मनोबल वाढवावे व कार्यकर्त्यां कशा तणाव पूर्ण कशा कार्य करेल.तसेच कार्यकर्त्यांवर येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शोसल डिस्टन पाळून व मास्कचा वापर करून कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली.दिल्लीवरून आलेले श्री नवीन गौतम, अॅड डॉ केवलजी उके, अॅड बि जी बनसोड, वैभव गिते,प्रा.रमाताई अहिरे,पि एस खंदारे, प्रमोद शिंदे आदींनी पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED