हिंगणघाट प्रशासनाने केली टाळेबंदीची घोषणा

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.21फेब्रुवारी):-जिल्ह्यातील कोरोनाचे वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात प्रशासनाने आज (20 फेब्रुवारी) रात्री ८ वाजेपासुनच टाळेबंदी घोषित केली असून हिंगणघाट तालुका प्रशासनानेसुद्धा आपल्या क्षेत्रात टाळेबंदीची घोषणा केली आहे.
तालुक्यात शहर व ग्रामीण भागासाठी लागू केलेली टाळेबंदी यशस्वी व्हावी यासाठी पालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात कोरोना नियंत्रण चमु आज दि.१९ पासुनच सक्रिय झालेल्या असल्याचे दिसुन येत आहे.आज सर्व बाजारपेठ सायंकाळी ७ वाजता वेळेवर बंद करण्यासाठी हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हाण हे गस्तीवर दिसुन आले.

यावेळी महसुल विभाग, पालिका कर्मचारी,पोलिस कर्मचारी नागरिकांना टाळेबंदी यशस्वि करण्यासाठी आवाहन करीत होते.
सद्या लग्नसराइचा ठोक असल्याने उद्या नियोजित लग्न,साक्षगंध,स्वागत समारोह करणाऱ्या नागरिकांना फक्त २० व्यक्तीच्या उपस्थितिची परवानगी देण्यात आली आहे.शहरात एकूण ९ लग्न,स्वागत समारोह आदि कार्यक्रमासाठी टाळेबंदी दरम्यान परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने आज दिली.आज रात्री ८ वाजेपासुन लागू करण्यात आलेली टाळेबंदी सोमवार सकाळी ८ वाजेपर्यत लागू राहणार असून नागरिकांनी घराबाहेर न निघता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस ठाणेदार संपत चव्हाण यांनी यावेळी केले.

शहरात तसेच ग्रामीण भागात कालपासुनच नियंत्रण पथके सक्रिय झालेली दिसत असून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरने,सामाजिक दुरता बाळगने,सैनिटाइजर किंवा साबनाचा वापर करीत हात वारंवार धुण्याचे आवाहन करीत कोविड-१९ ची संहिता न पालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्या जात असल्याचे दिसुन येत आहे.आज रात्रीपासून पेट्रोलपंप,बससेवा,खाजगी बससेवा बंद करण्यात आली असुन वैद्यकीय सेवा,खाजगी दवाखाने,औषधी दुकाने,भोजन पार्सलसेवा यांना यातून वगळण्यात आले आहे.