येवला तालुक्यातील पाटोद्यात जुन्या उधारीच्या वादातून एकाचा खून

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21फेब्रुवारी):-येवला तालुक्यातील पाटोदा येथे जुन्या उधारीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून येवला तालुक्यातील पाटोदा गावात उधारीचे पैसा यातुन खुन परिसरात पहिलीच घटना घडली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरूआहे मृत्यप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे . दारूच्या नशेत झालेल्या या घटनेत ठाणगाव येथील एकाचा बळी गेला आहे . अरुण रामचंद्र शिंदे यांनी याबाबत येवला तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे . उपविभागीय अधिकारी तांबे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली . पोलिस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत . ठाणगाव येथील संजय रामचंद्र शिंदे यांच्याकडे पाटोदा येथील अरुण वाळूबा कुहाडे ( ४७ ) यांची सुमारे दीड वर्षांपासून एक हजार रुपयांची उधारी होती वेळोवेळी मागणी करूनही संजय शिंदे यांनी अरुण कु – हाडे यांची उधारी देण्यास टाळाटाळ चालवली.

उधारीच्या पैशावरून दोघांमध्ये दारू पिऊन वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले . या हाणामारीत संजय शिंदे यांना जास्त मार लागल्याने ते तसेच जखमी अवस्थेत घटनास्थळी पडून होते . घटनेची माहिती पोलीस पाटील मुजमील चौधरी यांना समजताच त्यांनी येवला तालुका पोलिसांना माहिती देऊन जखमीला रुग्णवाहिकेतून येवला ग्रामीण रुग्णालयात पाठवले . तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले . येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित अरुण वाळुबा कु – हाडे याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे .