गंगाखेड येथे कलावंताची कार्यकारणी निवड

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.21फेब्रुवारी):-जिवनात प्रत्येक माणूस हा कलाकार आसतो पण त्या कलाकाराणे स्वतःतले सुप्त कला गुण ओळखून आपल्या अंगातील कला जोपासावी तर ती कला भविष्यात लूप्त न होता त्या कलेचे एका पिढी कडुण दुस-या पिढी कडे हस्तांतर होऊन कलाकारांची कला जिवत राहील पहिजे. कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी जिल्ह्यात एक संघ उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र कलावंत व कला संवर्धन संघाचे मिलिंद साळवी यांनी कलाकारांच्या संपन्न झालेल्या बैठकीत केले.आज दि 20।02।2021 रोजी गंगाखेड सभागृहात कलावंताची बैठक घेण्यात आली यावेळी कलावंताच्या विविध प्रश्नांवर अडीअडचणीवर सांगोपांग चर्चा करून गंगाखेड तालुक्यासाठी कार्यकारणी केली.

गंगाखेड तालुक्यातील पारंपारिक लोककलावंत नाट्य ,नृत्य ,गायक, चित्रकार,वादक शिल्पकलाकार,आदि कलावंताच्या वेगवेगळ्या प्रश्नांना निर्भिड पणे मांडणारे विचारपिठ संघटण निर्माण हेतूने आज रोजी गंगाखेड येथे बाबुराव केळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कलावंताची कार्यकारणी करण्यात आली या वेळी नृत्य दिग्दर्शक बुद्धभूषण गाडे यांची तालूकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर सचिव सुशील गायकवाड, कोषाध्यक्ष संजय उर्फ अब्बा साळवे, तालुका संघटक हरिभाऊ लिंगायत,सदस्य मंगेश मोर ता टे, नेमिणाथ मंगले सचिन बल्लाळ, विश्वनाथ भेंडेकर, त्रिंबक साबळे व राम लोंढे आदिंची एकमताने निवड करण्यात आली आहे. या बैठकीस कलाकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धार्थ साळवेतर आभार प्रदर्शन शिवाजी कांबळे यांनी केले.