शिवजयंतीच्या निमित्ताने साकारला जंजिरा किल्ला

26

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.21फेब्रुवारी):-शिक्षण आणि छंद या दोन भिन्न गोष्टी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे असाच आपला छंद जोपासत आहे डॉक् टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्याविहार लोणेरे तालुका मान गाव जिल्हा रायगड येथील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली सायली राजे यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच चित्रकलेचा छंद जोपासत लॉकडाउनच्या काळाचा फायदा घेत त्यांनी पुणे येथील शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या खेड शिवापूर येथील दुर्वांकुर या घरात त्यांनी १०*१२ आकारातील तैल चित्र या प्रकारात जंजिरा किल्ल्याचे भव्य चित्र साकारले आहे. ती सातारा जिल्यातील खटाव ची रहिवासी आहे