शिवभक्त वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

34

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.22फेब्रुवारी):- संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चे कोरोना चे सर्व नियम पाळून अति उत्साहात साजरी होत असते वेळी कुठलेही कारण नसताना पोलीस प्रशासनाने काही शिवभक्ता वर गुन्हे दाखल केले याप्रकरणी आज उमरी तहसील कार्यालयात शिवभक्तांच्या व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड छावा युवा संघटना छावा क्रांतिवीर सेना मराठा मावळा संघटना मावळा युवा मंच च्या वतीने निवेदन देण्यात आले.

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरी होत होती यामध्ये कुठलीही काळीमा फासणारी घटना कोरणा चे सर्व नियम पाळत असते वेळी सुद्धा जोर शासनाने व प्रशासनाने शिवजयंती वर निर्बंध आणत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये शिवभक्तावर गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेवुन शिवभक्तांची जाहीर माफी मागावी अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर तिवृ पडसाद उमटतील असेही निवदनाद्वारे सांगण्यात आले.

यावेळी बालाजी पाटील ढगे, योगेश पाटील मोरे, अविनाश पाटील हिवराळे, राजेश पाटील मोरे, कैलास पाटील कदम, अरुण पाटील हंबर्डै, शुभम पाटील कदम, तिरुपती पाटील जाधव, हानमंत पाटील कुदळेकर, प्रतिक पाटील सावंत, कैलास पाटील उमरे,अनिल पाटील हिवराळे, साईनाथ पाटील हिवराळे, हानमंत पाटील जाधव, यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होत