जागर महिला शक्तिचा

48

राणी लक्ष्मीबाई. राजमाता जिजाऊ. रमाबाई आंबेडकर. मदर तेरेसा,इंदिरा गांधी,अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, बीबी फातिमा शेख अशी रत्ने आपल्या मातृभूमीत जन्माला आली आज आपल्या प्रत्त्येक महिलांना यांचे विचार अचाराप्रमाणे वागणे गरजेचे आहे. कोणताही अत्याचार सहन करुन नका त्याचा विरोध करा. महिला ही माया ममता प्रेम याचा सागर आहे. पण वेळ पडल्यास दुर्गा व महाकाली अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्ती असणाऱ्या अधर्माचा वध करा. कायदा आपल्या बाजूने आहे.कोण कोणत्याही प्रकारचा आपणास त्रास देतं असेल तर आपल्या घरच्यांच्या कानांवर घाला अन्यथा जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करा. आज मुलगी वाचवा नाहितर उद्या आई बहीण पत्नी कोठून आणाल आई हे सर्वात मोठे नावं आहे कारणं देवाने सुध्दा आईच्या पोटी जन्म घेतला आहे.

स्वातंत्र्योनंतर काळामध्ये विशेषतः १९७० नंतर कालखंडात महिलांच्या प्रशनाची सोडवणूक करण्यासाठी अनेक संसधबाहय राजकीय संघटना स्थापन झाल्या यामध्ये समाजवादी गांधीवादी महिलांचा पुढाकार होता हैदराबाद. १९७५ मध्ये प्रागतिक महिला संघटना स्थापन झाली त्याच सुमारास औरंगाबाद येथे महिला समता संघटना स्थापन झाली यातील पहिल्या संघटनेवर एंगलनसने महिलांच्या समाजातील गौण स्थानाबधदल मांडलेल्या विचारांचा प्रभाव दिसून दुसऱ्या संघटनेने महिला स्वातंत्र पुरस्कार करताना जातीयवादावर विशेष टीका केली.
आणीबाणीच्या काळात १९७५/७७ देशातील महिला संघटना मध्ये वैचारिक मंथन सुरू होते. आणीबाणीनंतर आणखी अनेक महिला संघटना स्थापन झाल्या त्यांचे कार्य प्रामुख्याने मुंबई दिल्ली मद्रास पाटणा अहमदनगर यासारख्या मोठ्या नगरा मध्ये सुरू झाले या संघटना मध्ये साधारण सुशिक्षित मध्यमवर्गीय महिलांचा सहभाग जास्त होता.

महिला संघटनांनी स्वतंत्रपणे आपल्या प्रशनासंबधी लढे उभारावे व आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरावे कि कामगार संघटना आणि इतर क्रांतिकारी संघटनांची हातमिळवणी करावी आणि आपले कार्य करावे याबाबत महिला संघटना मध्ये अंतर्गत चर्चा सुरू होती आणि साधारण या दोन्ही मताचा प्रभाव महिला संघटना यांचेवर पडलेला दिसतो १९७८ मध्ये मुंबईत समाजवादी विचारांचा व महिला मुक्ती पुरस्कार करणाऱ्या महिलांची पहिली परिषद भरली.१९७९/८० नंतर महिला संघटना यांनी हुंडाबळी आणि पोलिसाचे महिला वर होणारे अत्याचार याबद्दल चळवळ सुरू केली घरकाम करणाऱ्या तसेच गरिब गरजू अडाणी झोपडपट्टी राहणा-या तसेच महिलांना सुसंघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

वृत्तपत्रातून या संघटनांच्या कार्याला प्रतिसाद व प्रसिद्धी मिळू लागली तसा महिला संघटना यांचा आत्मविश्वास द्विगुणित होऊ लागला परंतु डाव्या विचारसरणीच्या महिलांनी देखील आपल्या संघटना स्थापन केल्याचे दिसून येते हुंडाबळी आणि पोलिसाचे महिला अत्याचार यांबाबत कितीही आवाज उठवला तरी न्यायालयामध्ये या गोष्टी सिध्द करणे अतिशय अवघड असते असाही अनुभव संघटनांना येऊ लागला तसेच पोलिसी अतयाचारासारखे प्रश्न राजकीय पक्षांनी देखील संसदेत मांडण्यास प्रारंभ केला या सर्व कारणांमुळे या प्रशनासंबधीचा महिला संघटना यांचा प्रारंभीचा उत्साह कमी झाला.

मोर्चे निदर्शने सभा इत्यादी नेहमीच्या प्रचार तंत्राबरोबर महिला संघटनांनी कलापथक पथनाट्य इत्यादी माध्यमांतून प्रमावीपणे उपयोग केलेला आहे महाराष्ट्रातील महिला मुक्ती संघटनेने मुलगी झाली हो. सारख्या मुकतनाटयादवारे महाराष्ट्राभर महिलांच्या प्रश्नाकडे समाजांचे लक्ष वेधले आहे. महिलांच्या काही संघटनांनी इतिहासामध्ये महिलानी गाजविलेलया पराक्रमासंबधी दाखले दिले आहेत पौराणिक कथांना निराळा अर्थ देऊन महिला अधिकार चळवळ एक परिमाण मिळवून दिले तेलंगणातील भूमिहीन मजूराचे लढे व चिपको आंदोलन यांतील महिला सहभागाचे वर्णन करताना अशा प्रकारच्या ऐतिहासिक वा पौराणिक कथांचा परिणामकारकरीत्या उपयोग होई.

समाजवादी व साम्यवादी विचारांच्या महिलांनी महागाई विरोधात आघाडी उघडून मुंबई शहरात वारंवार निदर्शनं केली व महागाई मुळें तसेच जीवनावश्यक वस्तू टंचाईमुळे मुख्यतः महिलांना कसा त्रास होतो याकडे सर्वांचे लक्ष अनेकदा वेधून घेतले.१९८५ मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मुस्लिम महिलांच्या पोटगी हक्कांबद्दलचा ऐतिहासिक निर्णय रद्द करण्यासाठी कांग्रेस सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती घडवून आणली त्याची तीव्रता महिला संघटना मध्ये उमटली तसेच १९८७ मध्ये राजस्थानातील देवराला या ठिकाणी सतीची घटना घडल्या नंतरही महिला संघटनांनी सती प्रथेविरूधद आवाज उठवला.

भारतातील महिलांच्या संसधबाहय राजकीय संघटना अशा प्रकारे कार्य करीत असताना ग्रामिण भागातील तसेच निरक्षर महिला यापासून कोसोदूर राहिल्या जोपर्यंत बहुसंख्य महिलांना या अशा संघटना अपणाकडे आकृष करु शकत नाही तोपर्यंत कुटुंब नियोजन महिला शिक्षण व आरोग्य निरक्षरता. यासंबंधीच्या त्यांच्या कार्याला वेग येणार नाही.आज महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे तयार करण्यात आले आहेत तरी सुद्धा आज महिला सुरक्षित नाही अपहरण बलात्कार ह्या घटना आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आज महिला छेडछाड प्रकरण शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा आज सुरक्षित नाहीत आणि आपणं मोठ्या मोठ्या अक्षरात लिहतो. बेटी बचाव बेटी पढावो पण हे आपले बोलणे व्यर्थ आहे.

✒️लेखक:-अहमद नबीलाल मुंडे ९८९०८२५८५९
संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा