धुळे शहर व ग्रामीण मधील युवासेना मुलाखतींसाठी युवतींचा मोठा सहभाग

28

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.25फेब्रुवारी):- धुळे शहरासह धुळे ग्रामीण मधील युवासेनेच्या मुलाखतींसाठी आज धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात अनेक युवतींनी मोठी गर्दी केली.आज दुपारनंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात धुळे ग्रामीण व धुळे शहरातील युवतींच्या मुलाखतीत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितलताई देवरुखकर-शेठ व युवासेना विस्तारक अमित पाटील यांनी मुलाखती घेतल्या. या युती मधूनच जिल्ह्यासाठी व ग्रामीण भागासाठी पुढील पदाधिकारी निवडला जाणार आहे.

युवासेनाप्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती पार पडल्या.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे, शहरप्रमुख संदीप मुळीक, उपजिल्हाप्रमुख राज माळी, हरीश माळी, उपशहरप्रमुख स्वप्नील सोनवणे, आकाश शिंदे व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शिवसेना/युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.