चिमूर नगर परिषद येथील सफाई कामगाराच्या कामबंद आंदोलनाची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

    34

    ?कार्यालय प्रमुख पंदिलवार यांची माहिती

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.25फेब्रुवारी):- नगर परिषद अंतर्गत सफाई कामगारांनी न प स्थापने पूर्वी पासून कार्यरत असणाऱ्या कामगारांना सेवेत समायोजन करण्यात यावे, वेतनवाढ करण्यात यावी, किमान वेतन कायदयानुसार वेतन देण्यात यावे, शासन निर्णयानुसार विशेष भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांनी सोमवार पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन ठेवल्यामुळे शहराची साफसफाई होत नव्हती, दोन दिवस कचरा नेण्याकरीता घंटागाडी येत नव्हती.

    याबाबत जी प सदस्य व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गजानन बुटके तथा पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय प्रमुख सुधीर पंदिलवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन याबाबतची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना दिली व त्यांना निवेदन स्वीकारून पाठविण्यात आले, त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता, नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती कार्यालय प्रमुख सुधीर पंदिलवार यांनी दिली आहे.