महावितरण विभागाची कृषी पंपावर आधारित कार्यशाळा तातडीने विद्युत कृषी पंप धारकांनीभरणा करण्याची गरज

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.25फेब्रुवारी):-ब्रह्मपुरी गांगलवाडी परिसरातील वीज वितरण कंपनी मंडळा अंतर्गत मोडणाऱ्या कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या कडे मागील कित्येक वर्षापासून कृषिपंप ग्राहकाचे कोट्यवधी रुपयाचे वीजबिल थकीत आहेत त्यासाठी कृषी पंप विज जोडणी धोरणांतर्गत ग्राहकांना दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज दिनांक 25 फेब्रुवारीला रणमोचन येथे विद्युत वीज वितरण कंपनी मंडळाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

त्याच विविध योजनेची माहिती देत कृषी पंप विज धोरण 20 20 अंतर्गत कृषी वीज बिलाची थकबाकी रकमेची 50 टक्के रक्कम 31 मार्च वीस-बावीस पर्यंत भरल्यास अतिरिक्त 50 टक्के सूट पाच वर या वर्षापर्यंतच्या थकबाकी वरील संपूर्ण विलंब आकार व्याजदरात सवलत पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकी वरील संपूर्ण व्याज व विलंब आकार माप उर्वरित रक्कम कृषी ग्राहकाच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा ग्रामपंचायतींना वसुलीवर भरघोस मोबदला ग्रामपंचायत कडे कृषी वीज बिल भरण्यास पर्याय उपलब्ध ग्रामपंचायतीकडून जमा झालेल्या रकमेतून 33 टक्के रक्कम ग्राहकासाठी पायाभूत सुविधा सुधारणे साठी वापरले जाईल बाकी नसणार्‍या व नियमित वीजबिल भरणार्‍या कृषी ग्राहकांना योजनेच्या चालू बिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत सर्व कृषी ग्राहकांना चालू वीज भरणे बंधनकारक राहील व तसे न केल्यास सदर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.

कृषी पंप शेतकरी धारकांनी लवकरात लवकर बिल भरणा करून आम्हाला सहकार्य करावे असे मार्गदर्शनही करण्यात आले अन्यथा वीज पुरवठा आदेशानुसार खंडित करण्यात येईल माहिती देण्यात आली असून सदर विषयाला अनुसरून कार्यशाळा घेण्यात आली.त्यात गांगलवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता तुपे ब्रह्मपुरी उपविभागाचे सहाय्यक अभियंता समर्थ लाईन मॅन नवघडे, रणमोचन ग्रामपंचायत च्या सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान , अश्विनी दोनाडकर, मंदा सहारे ,कोमल मेश्राम , घनश्याम मेश्राम, पत्रकार विनोद दोनाडकर यांच्यासह कृषी पंप धार का पैकी शेतकरी वर्गातून विठ्ठल सहारे, ऋषी सहारे अधिकराव पिलारे , विश्वास राऊत, योगेश पिलारे , मनोहर तोंडरे, दादाजी पिल्लारे, किशोर दोनाडकर , भाऊराव दोनाडकर, भास्कर मुरुसकर , लक्ष्मण शेंडे, गोपाल राजशेखर , रमेश रासेकर, नीलकंठ प्रधान, श्रावण तोंडरे, होमराज नाकतोडे , बाबुराव राउत यांच्यासह अनेक शेतकरी वर्ग कार्यशाळेला उपस्थित होते.