सार्वभौम ग्रामसभा समन्वय समितीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रामसभा सक्षमीकरण वर मार्गदर्शन संपन्न

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):- सार्वभौम ग्रामसभा समन्वय समिती भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रामसभा सक्षमीकरण यावर चांदापुर या गावी मार्गदर्शन पर कार्यक्रम करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शनची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून समोर यायला हवी व त्या माध्यमातून त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व्हावे.

त्याकरिता सार्वभौम ग्रामसभा समन्वय समिती ने पुढाकार घेऊन नागपूरचे श्री उद्धव रावजी साबळे यांना मार्गदर्शना करिता बोलावून त्यांनी सुंदर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यासोबत ग्रामसभा सक्षमीकरण यावर विषयावर सार्वभोम ग्रामसभा समन्वय समितीचे संघटक प्रा. मिलिंद सूपले,यांनी मार्गदर्शन केले.त्याच सोबत बोरुले दादा,विनोद कोहपरे दादा व समस्त चांदापूर ग्रामस्थ उपस्थित होते.चांदापूर ग्रामस्थांनी सर्व मार्गदर्शक मंडळी चे आभार मानले.