सफाई रोजदांरी 6 कामगारांना मिळाला न्याय

  31

  ?सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर (नि.पा.पाटणकर ) यांनी दिले नगर परीषद प्रशासनाचे आदेश

  ?सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी कंत्राट दाराची केली हकालपट्टी

  ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

  ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):- ब्रम्हपुरी नगर परिषद अंतगर्त घनकचरा व्यवस्थापनाचे रोड सफाई व कच्चरा संकलित गाडी चे कंत्राट कंत्राट दार ओमप्रकाश रामटेके सांभाळीत होते. मात्रं गेल्या 1 ऑगस्ट 2020 पासून लॉकडाऊनचे काळात कामगारानी हात मोजे व माक्स व इतर सेप्टी कीट ची मागणी केली असता कंत्राट दारांनी कामगार वर शिवीगाळ करून व महिला कामगाराना काढण्याची धमकी दिली व 6 कामगाराना कोणत्या ही पुर्व सूचना न देता कामावरून काढून टाकले. नगर परिषद करारनामा नुसार किमान वेतन कायद्या नुसार मजुरांना वेतन अदा न करणे,बँकेत खाते न उघडता धनादेश द्वारे वेतन देने, epf न भरणे व इतर बाबी संदर्भात कामगारांची अवहेलना करणे असे कंत्राटदाराचे प्रताप राजरोस पणे सुरू होते.

  कामगारानी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर येथे धाव घेतली तेव्हा कामगार सहाय्य क न्यायमूर्ती नि.पा. पाठणकर यांनी अन्याय झालेल्या 6 कामगाराना कामावर रुजू करणे, कामगारांचे वेतन बँकेत करणे, नियमानुसार epf भरणे ,कामगाराणा पुर्व सूचना बंद करता येणार नाही , कंत्राटदारंने कंत्राट घेतलं तर कामगार चे वेतन महिने वारी देण्याचे काम कंत्राटदाराला करता येत नसेल तर त्यांनी कंत्राट घेऊ नये. कंत्राटदार बदलतात परंतु कामगार बद्दल त नाही अशी सुनावणी आदेश कंत्राटदार ओमप्रकाश रामटेके यांना न्यायमुर्ती नि. पा पाठणकर यांनी दिली तसेच 6 कामगारांना त्वरित कामावर रुजू करावे असे आदेश डेप्ती ceo पिसाळ साहेब, आरोग्य निरीक्षक ठोबरे साहेब यांना दिले . आदेश देते वेळी अ. भा. सफाई मजूर काँग्रेस राज्य सहसचिव मा. राजेश रणसूर ,कामगार नेते गोवर्धन काळे,अ. भा. बेदरे, दीपक मसराम, अमर सुर्यवंशी , राहुल आंबोरकर , चंद्र कला धनविज, पुष्पा तुपटे हे उपस्थित होते.