जनहिताय जनसुखायसाठी भीम टायगर सेनेचे पाईक बना : किशोरदादा कांबळे

26

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.26फेब्रुवारी):-बी टी एस ऑटो ॲम्बुलन्स च्या माध्यमातून रुग्णसेवे सोबतच बहुजन समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी जनहिताय जनसुखाय या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर भिम टायगर सेना कार्यरत आहे. या विचारावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बी टी एस चे पाईक बना असे आवाहन भिम टायगर सेना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी बोरी (ईजारा) च्या शाखा फलकाच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित गावकऱ्यांना केले.अराजकीय असलेल्या भिम टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या बोरी ईजारा शाखा उद्घाटन सोहळा दि. 25/2/2021 रोजी बी टी एस चे विदर्भ संपर्क प्रमुख पंजाबदादा कांबळे यांच्या हस्ते झालेल्या फलक अनावरण कार्यक्रमाने गायनाच्या माध्यमातुन समाजजागृती केली.

व बिटीएसचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष विनोददादा फुलमाळी यांच्या समाज प्रबोधन मार्गदर्शनाने व फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक अंतर पाळीत व मास्कचा वापर करीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमा च्या निमित्ताने पुसद तालुक्यामध्ये कोरोना काळात परराज्यातील ताटकळत पडलेल्या मोलमजुरांना राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करीत तसेच खितपत पडलेल्या गोरगरीब गरजुंना जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या माध्यमातून जेवणाच्या व्यवस्थेसह अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले या सामाजिक योगदाना बद्दल बोरी (ईजारा) वासियांनी किशोरदादा कांबळे यांचा नागरी सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांच्या या कार्याला सदिच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन बिटिएस जिल्हा सचिव अण्णा दोडके, पुसद तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, उपतालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे,महागांव तालुकाध्यक्ष निलेश रनविर, बीटीएस सर्कल अध्यक्ष कपिल ईंगोले काळी, जनार्दन झोडगे काटखेडा ,गौतम खडसे, दत्त रावजी कांबळे संजय शेळके संदीप मनवर मोदी महेश भालेराव देवानंद पडघणे वडद विकास कांबळे व गणेश राऊत हिवरी, तसेच विकास खंदारे यांच्यासह ईत्यादि कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.

या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन संदिप आठवले भिम टायगर सेना शाखाध्यक्ष बोरी व उपाध्यक्ष राहुल लोणकर,सचिव दिलिप पाचपुते,सल्लागार केशव घावस, कोषाध्यक्ष चंद्रकांत आठवले,सहससचिव सतिस दुथडे,उपसल्लागार रावसाहेब जोगदंडे,उप कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर चिरमाडे यांनी केले होते. या फलक अनावरण सोहळ्यात चे प्रभावी सुत्रसंचालन जनार्धन गजभिये यांनी तर उपस्थितांचे आभार भिम टायगर सेना शाखेचे अध्यक्ष संदीप आठवले यांनी मानले.