मोटारसायकल चोरटा पोलिसांचे ताब्यात

31

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.26फेब्रूवारी):-शहरातील युवकाच्या मोटरसायकल चोरीप्रकरणी हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने एका तीस वर्षीय चोरटयास अटक केली.
सदर चोरट्याची ओळख सुशील दिलीपराव पाटिल अशी असून तालुक्यातील शेगांव (कुंड) येथील रहिवासी आहे.दि. 16 फेब्रूवारी रोजी संध्याकाळी 7 वाजताचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने शहरातील रुबा चौक येथील मोबाईल दुकाना समोरुन एम.एच.32 एक्स 6420 सुपर प्लेन्डर काळया रंगाची मोटर सायकल चोरुन नेली. अशी तक्रार फिर्यादी संकेत तानबाजी मुन रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट यांनी केली होती.

सदर तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 0160/2021 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला.
स्थानिक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीचा शोध घेतला असता खबरीकडून मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी एम.एच.32 एक्स 6420 सुपर प्लेन्डर काळया रंगाच्या मोटरसायकलसह आंबेडकर शाळेजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरुन आरोपी सुशिल दिलीपराव पाटील, वय 30 वर्ष, रा. शेगाव कुंड ह मु. मिलीद सोसायटी हिंगणघाट यास अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन चोरी गेलेली 25 हजार रुपयेची किंमतीची मोटरसायकलसुद्धा जप्त करण्यात आली.

सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण,यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, पंकज घोडे, विशाल बंगाले. पोशि सचिन भारशंकर, सुहास चांदोरे यांनी केली.