जीवनदर्शन बहुउद्देशीय संस्था , शाखा नेरीनी केले व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

33

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.27फेब्रुवारी):-तालुक्यातील हरनी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतीथी नीमीत्य मंजुळा माता महीला भजन मंडळ खाबांडा यांनी २३ फेब्रुवारीला जीवन दर्शन बहुउद्देशीय संस्था शाखा नेरी यांच्या संयुक्त वीद्यमाने व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व भजनमाला कार्यक्रम संपन्न झाला .हरनी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतीथी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोनाचे नीयम पाळीत साध्या स्वरूपात साजरी करण्यात आली.

 यानीमीत्याने २३ फेब्रुवारीला पुण्यतीथीच्या जाग्रुतीच्या कार्यक्रमाला सायंकाळी मंजुळा माता महीला भजन मंडळ खाबांडा तथा जीवनदर्शन बहुद्देशीय संस्था , शाखा नेरी यांच्या संयुक्त वीद्यमाने व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व भजनमालाचा कार्यक्रम घेण्यात आला.या व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व भजनमाला कार्यक्रमाच्या वामन बावणे , मीरा ढोक , साधना श्रीरामे , वर्षा ढोक , शुभांगी खाटे , उषाबाई माफुलकर , शालु बावणे , मंदा शेरकुरे , जीजा जीवतोडे , सुशीला वाकडे , कचरू नन्नावरे , श्रीधर कायरकर , तुकडु कडवे उपस्थीत होते .