ॲड. विवेकानंद घाटगे लढाऊ व्यक्तिमत्त्व : एस. पी. कुलकर्णी

28

🔸नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार वितरण

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.1मार्च):- ॲड. विवेकानंद घाडगे हे संवेदनशील मनाचे व्यक्तीमत्व असून आयुष्यभर सामाजिक बांधिलकी मानून त्यांनी कार्य केले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात होणाऱ्या अनेक आंदोलनात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांच्याकडे सर्वत्र लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पहिला नीतीप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्कार एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. विवेकानंद घाटगे यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम पाच हजार रुपये व दहा हजार रुपयांची पुस्तके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे अध्यक्ष अनिल म्हमाने म्हणाले, ॲड. विवेकानंद घाडगे यांचे न्यायिक क्षेत्रातील कार्य महत्वपूर्ण असून कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर मूळ फिर्यादीकडून ॲड. विवेकानंद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली 500 हुन अधिक वकिलांचे वकीलपत्र दाखल करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायिक व्यक्ती म्हणून पाहिले जाते. त्यांचे नेतृत्व व्यापक व दिशादर्शक आहे.
ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ॲड. विवेकानंद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर खंडपीठाचा लढा मोठ्या ताकतीने लढवला गेला. खंडपीठासाठी आझाद मैदान, मुंबई येथे त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे म्हणाले, ॲड. विवेकानंद घाडगे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी मूलभूत कार्य केले आहे. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ते सलग दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. स्वतः च्या खर्चातू त्यांनी अनेक विधायक कामे केली आहेत. न्यायासाठी सतत झगडणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सत्काराला उत्तर देताना ॲड. विवेकानंद घाडगे म्हणाले, या पुरस्काराचे माझी उंची व जबाबदारी वाढवली आहे. माझ्या भावी जीवनात मी आणखीन जोमाने काम करेन. सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये ट्रस्टचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य व पुरस्कारामागील भूमिका सांगितली.

सुरेश केसरकर यांनी सत्कारमूर्ती ॲड. विवेकानंद घाडगे ओळख करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात गायक कबीर नाईकनवरे यांनी भारतीय संविधानाची प्रास्ताविक वाचून केली.यावेळी मोहन मिणचेकर, ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. अकबर मकानदार, ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. शैलजा चव्हाण, डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. शोभा चाळके, मंदार पाटील, पंकज खोत, संजय नाझरे, विमल पोखर्णीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ॲड. अधिक चाळके यांनी मानले.